कोरोनाची भीती संपली, रत्नागिरी बाजारपेठेत नागरिकांची वाहनासह मोठी गर्दी
शासनाने लॉकडाऊन ४.० मध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी दुकाने व बाजारपेठेबाबत काही नियमात थोडी शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता बाजारपेठा सायं. ५ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता या शिथिलतेचा काही जण फायदा घेताना दिसत आहे. आज सकाळी रामआळी,गाेखले नाका परिसरात लोकांनी वाहनासह मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. दुकानातही मोठ्या प्रमाणावर ग्राहक गर्दी करीत आहेत. तसेच अनेकवेळा ग्राहक मास्कचाही वापर करताना दिसत नाहीत. मध्यंतरी प्रशासनाने रामआळी हा पूर्ण भाग दुचाकी व तीनचाकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्याची काही दिवस अंमलबजावणीही झाली. मात्र आता बाजारपेठ भागात रिक्षा व दुचाकी व फोर व्हिलर वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे हा बाजार परिसर गर्दीने फुलून गेला होता.
www.konkantoday.com