अलिबागमध्ये शासकीय रुग्णालयातील दोन वॉर्डबॉयना संसर्ग

राजेश बाष्टे अलिबाग-आज अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी काम करणारे दोन वॉर्डबॉय संसर्ग झाल्याने एकच धावपळ उडाली आहे. जर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला तर उपचारासाठी आरोग्यसेवक कसे काम करतील असा मोठा गंभीर प्रश्न आरोग्य प्रश्नासमोर उभा राहिला आहे.
रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. जिल्हा प्रशासन मात्र रायगड जिल्हा कश्या पध्दतीने सुरक्षित असून रेड झोनची भीती नसल्याचा दावा करत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात महाड येथील कोरोना युद्धात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या परिचारिकेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावरील यशस्वी उपचारांनंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह होऊन आठच दिवसांच्या आत त्या कोरोना मुक्त होऊन पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे आतापर्यंत एकच आरोग्यसेवक कोरोना बाधित झाल्याची घटना असताना आज शनिवारी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड उपचार केंद्रात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या कोरोना योद्धे असणाऱ्या आरोग्यसेवकांपैकी दोन वॉर्डबॉय यांच्यात लक्षणे आढळल्याने त्यांचा स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज हाती आला. धक्कादायक दायक आलेल्या या रिपोर्ट नुसार दोघांनाही कोरोना चा संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रुग्णालय परिसरात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही कोरोना योद्ध्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

माणकुळे तसेच नवगाव येथे आढळलेल्या दोन रुग्ण तसेच दोन वॉर्डबॉय अशा चार रुग्णांमुळे 
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात आढळलेल्या रुग्णांची संख्या ३६ वर जाऊन पोहचली आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button