सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आज दुपारी कोरोना तपासणीचे 25 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 17 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील 1, हरकुळ बुद्रुक येथील 1, पियाळी येथील 1, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी येथील 1, माडखोल 1, इगवेवाडी 1 तर वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या सर्वाचे स्वॅब दिनांक 22 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. संध्याकाळी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. सदर रुग्ण हा मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील आहे.
आज अखेर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39 झाली आहे. त्यापैकी 7 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यु झाला असून 1 रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सध्या जिल्ह्यात 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com