संगमेश्वर तालुक्यातील धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश
संगमेश्वर तालुक्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून धोकादायक असलेल्या ठिकाणी दुरूस्तीला प्राधान्य द्या असे आदेश तहसीलदार सुहास थोरात यांनी आढावा बैठकीत दिले. नुकतीच तहसिलदार कार्यालयात नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तहसिलदार यांनी प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारित असलेल्या इमारती, धरणे, तलाव, शाळा, पुल, साकव आदी कामांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे असे आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com