राज्यात गुरुवारी दिवसभरात २,५९८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात गुरुवारी दिवसभरात २,५९८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ इतकी झाली आहे. यापैकी बरे झालेले आणि मृतांचा आकडा वगळता राज्यातील ३८ हजार ९३९ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात ८५ जणांचा मृत्यू झाला असून ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १८ हजार ६१६ नागरिक कोरोनामुक्त झाले, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.२६ टक्के एवढे आहे, तर मृत्यूदर ३.३२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ६,१२,७४५ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५,१२२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
www.konkantofay.com