मासेमारीसाठी १ जून पासून पावसाळी बंदी कालावधी सुरू होत असल्यामुळेहर्णै बंदरातील सुमारे ९० टक्के नौका किनार्यावर

मासेमारीसाठी १जूनपासून पावसाळी बंदी कालावधी सुरू होत असल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका किनार्यावर सुरक्षित ठेवायला सुरूवात केली आहे. हर्णै बंदरातील सुमारे ९० टक्के नौका किनार्यावर विसावल्या असून उर्वरीत नौकाही येत्या ४ दिवसात किनार्यावर येणार आहेत. यामुळे कायम गजबजलेले हर्णै बंदर दोन महिने सुने होणार आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात सुमारे ८००नौका मासेमारीसाठी उभ्या असतात. येथील बंदरातील मच्छी मुंबई, पुणे, गोवा, मेंगलोर, कोचिन आदी ठिकाणी पाठवण्यात येते. खुल्या लिलाव पध्दतीमुळेे येथे पर्यटक, हॉटेल व्यावसायिक ताज्या मासळीसाठी थेट येत असतात. त्यामुळे मच्छीला चांगला दर मिळतो. मात्र यावर्षा वादळ-वारे, मत्स्य टंचाईसारख्या कारणांमुळे त्रस्त झालेल्या मच्छीमारांना कोरोना काळातील लॉकडाऊनचे अधिकच फटका दिला.
मात्र पावसाळी बंदी कालावधीचा विचार करून शासनाने मच्छीमारांना दुसर्या लॉकडाऊनमध्ये शोसल डिस्टनसिंगचे नियम पाळून व्यवसाय करण्यास सूट दिली. तरीही कोरोनाची धास्ती आणि लिलाव बंदी, हॉटेल, पर्यटक बंदीसारख्या कडक नियमांमुळे मासळीला अपेक्षित दर मिळणार नाही या कारणामुळे ७० टक्के नौका बंदच ठेवल्या होत्या. काही नौकांनी मात्र मासेमारी सुरू केली होती.
पावसाळी बंदी कालावधी जवळ आल्याने हर्णै बंदरातील मच्छीमारांनी बोटी किनार्याला आणायला सुरूवात केली आहे. जेटी अभावी या नौका आंजर्ले खाडी, दाभोळ खाडीत विसावल्या आहेत. तर काही नौका हर्णै बंदरात किनार्यावरच उभ्या केल्या जात आहेत. पूर्वा या नौका किनार्यावर ओढत आणण्यासाठी ४० ते ५० कामगार एका नौकेसाठी लागत असत. मात्र हे काम ट्रॅक्टर मुळे सुलभ व कमी खर्चिक झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
www.konkantoday.com

Buy products from Amazon and get best offers

Be safe by wearing a mask at public place

KN 95 Mask set of 5

Mediweave KN95 Face Mask 5 Pieces (2 +2 +1 sub packets)

Price – 799 ₹ ( To buy click on Image below )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button