
ग्रामीण भागातील कोरोनाची भीती घालविण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलावीत – जि.प.आरोग्य सभापती बाबू म्हाप
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण सापडत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाची भीती तसेच संभ्रमाचे वातावरण आहे. यामधून ग्रामीण जनतेला बाहेर काढण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने प्रबोधन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने पावले उचलावीत असे आदेश जि.प.चे आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत बोलताना दिले. यासाठी आवश्यक असणार्या उपाययोजना ग्रामपातळीवर कराव्यात असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com