गावात स्थापन झालेल्या कृती दलाच्या कामगिरीच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आखली कोरोना लढा सन्मान स्पर्धा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाहेरून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असून ग्रामीण व शहर भागात या चाकरमान्यांची जबाबदारी कृतीदलावर जिल्हा प्र्रशासनाने सोपविली होती. चाकरमान्यांसाठी नियम ठरविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कृतीदलाने करावयाची आहे. याप्रमाणे जिल्ह्यात अनेक भागात कृती दले काम करीत आहेत. या कृतीदलांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात गाव/वाडी /नागरी कृती दलाचा कोरोना गौरव सन्मान करण्याची योजना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या कृतीदलांच्या मुल्यमापनासाठी विविध कमिट्या नेमण्यात आल्या असून ते या सर्वांमधून विजेत्या कृतीदलाची निवड करणार आहेत. यासाठी जिल्ह्यासाठी प्रथम क्रमांकाला रोख पारितोषिक २ लाख व सन्मानचिन्ह, असे स्वरूप आहे तर प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येक प्रथम क्रमांक १ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तर द्वितीय क्रमांकासाठी ५० हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तर तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 www.konkantoday.com

Buy products from Amazon

Enhance your selfie video quality on your phone with help of Ring Light

Venganza FL-36 Double Bright Soft White Color Selfie Ring Light with 3 Modes and 36 LED for Smartphones

Price – 349 /- ₹ only click on below image to buy

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button