
वाहतूक पोलीस शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महिपती जामदार सेवानिवृत्त
रत्नागिरी ः वाहतूक पोलीस शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महिपती दगडू जामदार नुकतेच सेवानिवृत्त झाले. पोलीस दलामध्ये त्यांनी ३६ वर्षे सेवा बजावली. या कारकिर्दीत त्यांनी दरोडा, बलात्कार, केटामाईन अंमली पदार्थ आदी गुन्ह्यात चांगली कामगिरी केली. गोपनीय विभागात महत्वाचे बंदोबस्त, मोर्चे हाताळले. पोलीस दलाकडून त्यांना २१० बक्षिस मिळाली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी नुकताच त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार केला.




