अखेर त्या बिबट्याला पकडण्यात यश,मात्र वन अधिकारी किरकोळ जखमी

रत्नागिरी बावनदी येथील शेलटी गावात महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर पकडण्यात वनविभागाला व ग्रामस्थांना यश आले आहे.या बिबट्याने भरदिवसा एका महिलेच्या चेहऱ्यावर पंजा मारल्याने ती जखमी झाली होती.त्यानंतर आणखी एका माणसाच्या मागावर हा बिबट्या झाडावर जाऊन बसला होता.जिल्हा परिषदचे सदस्य पर्शुराम कदम यांना ही माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी हजर झाले व त्याने जखमी महिलेला उपचारासाठी नेले तसेच वन विभागाला याबाबत माहिती दिली.वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. वनविभागाच्या रेंजर प्रियांका लगड व वनविभागाचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला.वनाधिकारी प्रियांका लगड यांचा पाय बिबटय़ाने पकडला.परंतू द्यावे तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवून बिबट्याला पकडले.यामध्ये लगड या किरकोळ जखमी झाल्या.या भागातील ग्रामस्थ विटूमामा नितोरे,किसन नितोरे,संतोश नितोरे,अमीत गावडे,सागर कदम,मयुर कदम व जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला मदत केली.ज्यानंतर या बिबटय़ाला पिंजऱयात पकडण्यात आले व वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button