राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी बनविलेली रिमोट कंट्रोल्ड कार्ट कोरोना विलगीकरण केंद्रास प्रदान

कोरोना व्हायरसचा विळखा जगासह आपल्या देशातही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सदर रुग्णांचे विलगीकरण करणे तसेच त्यांना त्याठिकाणी आवश्यक सुविधा प्राप्त करून देण्याचे काम शासन स्तरावर हाती घेण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूल व अन्य ठिकाणी विलगीकरण केद्र स्थापन करण्यात आली आहेत.

____________________________________

Buy products from Amazon and get discounts

Dont missout exercising even though gyms are closed

Kore PVC-DM COMBO16 Home Gym Dumbbells Kit

Price- 829₹ ( 10kg)click on image to buy

विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचर्यांनी रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मात्र रुग्णाशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे. याच अनुषंगाने आंबव  येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ब्लूटूथद्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली. संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने यांच्या हस्ते संगमेश्वर तहसीलदार मा. सुहास थोरात यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी विस्तार अधिकारी आर एम दारोकार, पोलीस निरीक्षक निशा जाधव, प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, पद्मनाभ शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे १० मीटरपर्यंत आणि जवळपास ९० किलो पर्यंतच्या वजनाची सामग्रीची ने आण करणे शक्य होते. रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधी देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल व त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता लाभेल.

महाविद्यालयाच्या प्रा. इसाक शिकलगार आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतिक महाडिक यांनी ही कार्ट तयार केली आहे.

प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या या एकात्मिक प्रयत्नाबद्दल मा. सुहास थोरात, तहसीलदार व अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच संस्थेचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button