दापोली उपजिल्हा रूग्णालयातील देवदूतांची प्रशंसनीय कामगिरी
दापोलीच्या आरोग्य विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड पॉझिटिव्ह आलेल्या आत्तापर्यंत तब्बल नऊ जणांना यशस्वी उपचार करून त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते. आज पुन्हा पाच पॉझिटिव्ह रूग्णांना बरे केल्याची गौरवास्पद कामगिरी बजावली आहे
एकूण आता सध्या फक्त तीन पॉझिटिव्ह रुग्ण येथे उपचार घेत आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी (नियमित व कंत्राटी) सर्व कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेवून कोरोना रुग्णांची सेवा करुन करोनामुक्त केल्याने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. .सगळ्या बऱ्या झालेल्या रुग्णांचे टाळ्या वाजवून आनंदी वातावरणात स्वागत करून त्यांना त्याच्या घरी सोडण्यात आले. त्याना पुढील काही दिवस घरीच सुरक्षित राहून योग्य ती काळजी घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com
____________________________________
Buy products from amazon and get exciting offers
Enhance your video listening experience by purchasing brand new bluetooth headphones
BoAt Rockerz 510 Bluetooth Headphone with Thumping Bass, Up to 10H Playtime, Dual Connectivity Modes, Easy Access Controls and Ergonomic Design (Raging red)
Price – 1499/- only To buy click on below image