होम कॉरंटाईनच्या नियमात दुजाभाव का? -आ. भास्कर जाधव

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात रूग्णसंख्या वाढत आहे. विशेषतः मुंबईकर चाकरमान्यांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळत आहे. मात्र अशाही परिस्थितीत जिल्हा प्रशासनात एकवाक्यता नाही. जिल्ह्यात कॉरंटाईन होणार्‍या लोकांना वेगवेगळे नियम लावण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यात होम कॉरंटाईनची मुदत वेगवेगळी कशी करून ठेवण्यात आली आहे. त्यातुन गावागावात वाद निर्माण होत असून प्रशासन जनतेच्या अडचणीत वाढ करते की काय? असा सवाल आ. भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. काही तालुक्यात कोणतीही लक्षणे नसताना व जे लोक नॉन कंटेनमेंटमधून आले आहेत अशा लोकांना तब्बल २८ दिवस कॉरंटाईन करून ठेवण्यात येत आहे. यासाठी जिल्हा स्तरावर एकसारखी नियमावली राबविण्यात यावी असे मत भास्कर जाधव यांनी नोंदविले आहे.
www.konkantoday.com

Buy products on Amazon and get best price

boAt Airdopes 311v2 True Wireless Earbuds (Bluetooth V5.0) with HD Sound and Sleek Design, Integrated Controls with in-Built Mic and 500mAh Charging Case (Active Black)

M.R.P – 6999 /- Offer price- 2,999/- To buy click on below image

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button