हॉटेल व्यावसायिक आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
हॉटेल व्यवसायाला ४थ्या लॉकडाउनमध्ये ही कोणताच दिलासा न मिळाल्याने हॉटेल व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. उत्पन्न नाही पण वीजबिल, नोकर पगार, सरकारी कर, देखभाल खर्च हे खर्च चालूच राहणार आहेत, त्यामुळे हवालदिल झालेल्या हॉटेल व्यवसायिकांनी व्यापारी वर्गाला दिलेल्या नियमावली नुसार हॉटेल व्यावसायिकांना सुध्दा ठराविक वेळामध्ये हॉटेल उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली असून त्याचप्रमाणे वीजबिल, GST कर, नगरपालिका कर या मध्ये सवलत मिळावी या सर्व मागण्यांसाठी आज रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन देणार आहेत
www.konkantoday.com