राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का-काँग्रेसचे नेते राहुल गांधी
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट झाली आहे. दररोज हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीह होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या विरोधकांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला चढवला आहे.राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
www.konkantoday.com