
माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकारामुळे नर्सरी उद्योजकांना व शेतकर्यांना दिलासा
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशात रोपे विक्री व वाहतुकीला रितसर परवानगी मिळणार असल्याने नर्सरी उद्योजकांना व शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. लॉकडावूनच्या काळात नर्सरी व्यवसाय ठप्प झाल्याने भविष्यात उदभवणार्या शेती व फलोत्पादन उद्योगांच्या समस्यांबाबत भाजप नेते संतोष गांगण यांनी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी वॉटसऍपद्वारे पत्रव्यवहार केला होता. त्याची प्रभू यांनी तात्काळ दखल घेवून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. व या विषयासंदर्भात त्यांना पत्र पाठवले आहे.
www.konkantoday.com
