
मच्छिमारांना डिझेल परताव्याचे जिल्हा कॉंग्रेसकडून स्वागत
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांना डिझेल परताव्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी मत्स्योद्योगमंत्री ना. असलम शेख यांचे अभिनंदन करून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मच्छिमारांना गेल्या अनेक वर्षापासून हक्काची डिझेल परताव्याची रक्कम न मिळाल्याने त्यांच्यावरील आर्थिक संकट वाढले होते. सदरची रक्कम मच्छिमारांना अदा करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी आगाशे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी शासनाकडे केली होती.
www.konkantoday.com




