भा.ज.पा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचा वाढदिवस विविध सेवाउपक्रम करत भा.ज.पा द. रत्नागिरीने साजरा केला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचा वाढदिवस द. रत्नागिरी भा.ज.पा ने सेवा उपक्रम राबवत साजरा केला. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय कोविड पेशंट तसेच अन्य वॉर्डातील पेशंटना फळे आणि बिस्कीट पुडे यांचे वाटप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. २०५ रुग्णांना फळ आणि बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.
आयटीआय तसेच दामले विद्यालयात असलेल्या कॉरन्टाईन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हॅन्डग्लोज बॉक्स तसेच सेनेटायझर्स, बिस्लरीपाण्याचे बॉक्स तसेच डास निर्मुलनासाठी मॉस्कीटो अगरबत्ती प्रदान करण्यात आल्या.
रिमांड होम रत्नागिरी येथे अॅड. दीपक पटवर्धन यांचे उपस्थितीत मुलांना कॅडबरी, चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच रिमांड होमला तांदूळ देण्यात आला. याप्रसंगी रिमांड होममध्ये आवर्जून बनवण्यात आलेला बर्थडे केक कापून रिमांड होम मध्ये वाढदिवसानिमित्त अॅड. दीपक पटवर्धन यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सुधाकरराव सावंत, व्ही.टी.जोशी रिमांड होमचे कर्मचारी उपस्थिती होते.
आशादिप संस्थेमध्ये दिपक पटवर्धन यांचे औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या. याठिकाणी मुलांसाठी बिस्कीट पुडे तसेच आशादिप संस्थेसाठी रु.१००००/- अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्तिगतरित्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून आशादिप संस्थेचे श्री.रेडकर साहेब यांचेकडे सुपूर्त केले.
याचप्रमाणे राजापूर येथे देवरुख येथे ही त्या त्या मंडलातील कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस साजरा केला.
उत्सवी स्वरूप टाळुन सेवाभावी वृत्तीने वाढदिवस साजरा करण्यात आला
सचिन वहाळकर, सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, व्ही.की.जैन, बाबू सुर्वे, सौ.राजश्री शिवलकर, सौ.रसाळ, सौ.करमरकर, सौ रायकर, श्री राजेश तोडणकर, श्री.उमेश कुलकर्णी, श्री.समीर तिवरेकर, देवरुख नगराध्यक्ष शेट्ये, पप्पू पाटील सौ.वेदिका गवाणकर, दादा ढेकणे, नितीन गांगण, प्रवीण देसाई, राजन पटवर्धन, राजू भाटलेकर, निखिल बोरकर, संदीप रसाळ, शैलू बेर्डे, राजेशजी सावंत, अशोक वाडेकर, दानिश चिलंगे, हेमंत रेडीज, मोहन बापट, राजेंद्र फाळके, रत्नाकर जोशी, मंदार खंडकर, मिलिंद साळवी आदी अनेक कार्यकर्ते विविध ठिकाणी सहभागी झाले.
राजापूर येथे सेनेटायझर चे वितरण झाले तर देवरूख येथे शिधा वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अॅड. दीपक पटवर्धन यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आवश्यक तेथे मदत कार्य पोहोचवत भा.ज.पा.ने साजरा केला व पुढील वाटचालीसाठी अॅड. दीपक पटवर्धन यांना शुभेच्छा देण्यात आल्या.