
हेल्मेट सक्ती शिथिल करण्याची रत्नागिरी शहर व जिल्हा काँग्रेस पदाधिकार्यांची मागणी..
रनागिरी शहर व जिल्हा काँग्रेस पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेउन हेल्मेट सक्ती शिथिल करण्याची मागणी केली.
लोकांची इंन्कम कमी झालेली आहे, लोकांचे रोजगार बुडालेले आहेत, व्यापार्यांचे व्यापार ठप्प झाले आहेत व पेट्रोल चे दर भयानक वाढलेले आहेत अश्यावेळी रत्नागिरी पोलिसानी नागरीकांवर हेल्मेट सक्तीच्या नावावर दंड वसूल करु नये.अशी मागणी जिल्हा कांग्रेस उपाध्यक्ष रमेश शाहा यांनी मा. रत्नागिरी जिलाधिकारी श्री पाटील यांच्या कडे केली.
यावेळी बोलताना रमेश शाहा म्हणाले, आगोदरच लोकांना कोरोना ने पिडले आहे. निदान पोलिसांनी तरी जनतेवर दया दाखवून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड वसूल करू नये. तसे आदेश जिल्हाधिकारी साहेबानी पोलिसांना दिल्यास जनतेवर खुप मोठी मेहेरबानी होईल.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश शाहा, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, अश्फाक कादरी, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर वह कांग्रेस चे ज्येष्ठ नेते बाळा करंजारकर उपस्थित होते.
www.konkantoday.com