
जिल्हांतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्याचे आदेश परंतु अनेक कर्मचारी मुख्यालयाबाहेर
राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात आंतरजिल्हा वाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. यातील कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे आदेश महामंडळाने दिले असले तरी लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातील एसटी कर्मचारी आपल्या गावाला गेले आहेत. सध्या जिल्हाबंदी असल्यामुळे हे कर्मचारी आपल्या गावातच अडकून पडले आहेत. त्यामुळे महामंडळाने आदेश दिले असले तरी कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी हजर होणे सध्या तरी कठीण दिसत आहे.
www.konkantoday.com