
सूर्यकांत दळवी यांच्या हकालपट्टीची मागणी करणार -नामदार रामदास कदम
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी माझी बदनामी करण्यासाठी पत्रकार परिषदेत मी जादू टोणा करत असल्याचे सांगितले आहे.त्यांचे हे विधान मी गांभीर्याने घेतले असून लवकरच त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नामदार रामदासभाई कदम यांनी सांगितले. पक्षविरोधी काम करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी आपण पक्ष श्रेष्टीकडे करणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. कावीळ झालेल्या माणसाला जग नेहमी पिवळे दिसते त्याप्रमाणे सुर्यकांत दळवी यांच झाला आहे.त्यांना सध्या सगळीकडे रामदास कदम दिसत आहेत. सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका करताना नामदार कदम म्हणाले दापोली विधानसभा तुमची पर्सनल प्रॉपर्टी नसून शिवसेनेची जायदाद आहे.तुमचे दिवस आता गेले आहेत. यापुढे तुम्हाला दापोली विधानसभेचे तिकीट नाही तर एसटीचे तिकीट काढून तुम्हाला मुंबईत पोचवल्या शिवाय येथील शिवसैनिक शांत बसणार नाही. माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल दळवी यांच्यावर आपण १०कोटींचा दावा दाखल करणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
www.konkantoday.com