मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचा पलटवार
मजुरांना घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्या पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्याकडे मजुरांची यादी तयारी आहे. पण ट्रेनच मिळत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे केंद्रावर निशाणा साधला. त्याला आता रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोयल यांनी ३ तासांमध्ये ५ ट्विट्स केली आहेत.राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी दररोज ८० रेल्वे गाड्या हव्या आहेत.मात्र आम्हाला केवळ ३० ते ४० गाड्याच दिल्या जात आहेत. आमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. पण गाड्याच उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पलटवार केला. ‘आम्ही महाराष्ट्राला १२५ श्रमिक विशेष गाड्या देण्यास तयार आहोत. तुमच्याकडे मजुरांची यादी तयार असल्याचं तुम्ही म्हणालात. त्यामुळे गाड्या कुठून सोडायच्या आहेत, रेल्वे गाड्यांनुसार प्रवाशांची यादी, त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रं आणि रेल्वे कुठे सोडायच्या आहेत, याची माहिती पुढील तासाभरात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कळवा,’ असं आवाहन गोयल यांनी केलं
www.konkantoday.com