जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा दिला सल्ला
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ३८ हजारहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ४ हजारहून अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, जास्त प्रभावित असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यास अधिक गंभीर परिस्थितीत होऊ शकते. तसंच अजून बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागेल.
जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, चंदीगढ आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यास मनाई केली आहे.
www.konkantoday.com