घाटात दरडी कोसळू नये यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात व अन्य घाटात दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे परशुराम घाट, कुंभार्ली घाट, कशेडी घाट, आंबा घाट आदी ठिकाणी वाहतूक पावसात सुरळीत चालू रहावी यासाठी संबंधित यंत्रणेनेे वेळीच नियोजन करावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
www.konkantoday.com