सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला. कुडाळ तालुक्यातील 52वर्षीय महिला कोरोना बाधित. 17मे रोजी सदर महिला मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. तीचा 20 मे रोजी स्वाब तपासणी साठी घेतला होता.आज तीचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामूळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या 17झाली आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिली आहे.