संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या चाकरमान्यांनी निर्माण केला वेगळा आदर्श
एकीकडे मुंबईतून येणार्या चाकरमान्यांना कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या साथीमुळे चाकरमान्यांवर ही वेळ आली आहे. एरवी गावाच्या विकासात चाकरमान्यांचा चांगला वाटा असतो. चाकरमानी देखील गावासाठी काहीना काही तरी करीत असतात. राजापूर तालुक्यातील कात्रादेवी वाडी येथे जि.प. शाळेत काही चाकरमान्यांना क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले आहे. या शाळेत असलेल्या विलगीकरणातील चाकरमान्यांनी त्या ठिकाणी देखील सामाजिक काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी शाळेची साफसफाई करणे, फुलझाडांना पाणी घालणे, मैदानाची लेव्हल करणे, कंपाऊंड नीट करणे आदी कामे सुरू केली आहेत. क्वॉरंटाईनमध्ये नुसताच वेळ घालवण्यापेक्षा चाकरमान्यांनी अशा रीतीने घेतलेल्या या सकारात्मक पवित्र्यामुळे शाळेची देखील चांगल्या रितीने देखभाल होत आहे. व गावाबद्दलची आपुलकी चाकरमान्यांच्या कृतीतून सिद्ध झाली आहे.
www.konkantoday.com