संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेची धडक बसून गवा रेडा ठार
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेची धडक बसून गवा रेडा ठार झाल्याची घटना
आज रविवारी २४रोजी घडली.
धामणी यादववाडीतील ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यांंने या मृत गवा रेड्याची वन विभागाने विल्हेवाट लावली .
धामणी रेल्वे मार्गावर गवा रेडा मृत झाल्याची माहिती संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक प्रमूखानी देवरुख वन विभागाचे वनपाल श्री सुरेश उपरे याना सायंकाळी दिली. वन विभागाचे विभागीय वनाधिकारी र. भि. भवर आणि रत्नागिरी येथील परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड यांचे मार्गदर्शन नुसार श्री उपरे यानी वनरक्षक नानू गावडे; शर्वरी कदम तसेच संतोष कदम दिनेश गुरव आदीसह घटनास्थळी दाखल झाले मृत गवा हा नर जाती आणि सात वर्षांचा होता. या अवाढव्य रेड्याची यादववाडीतील ग्रामस्थांचे सहकार्यामुळे विल्हेवाट लावण्यास मोठी मदत झाल्याचे श्री उपरे यानी आवर्जुन नमूद केले.
www.konkantoday.com