
रत्नागिरी शहरातील नळ पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनी चाचणीचा शुभारंभ मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला
रत्नागिरी शहराची पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी नव्याने मंजूर झालेल्या सुधारित पाणीपुरवठा योजनेमधील शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी बदलून त्या ठिकाणी नवीन मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले.या जलवाहिनीच्या चाचणीचा शुभारंभ नामदार उदय सामंत यांच्या हस्ते आज शीळ येथे पार पडला.पूर्वीच्या जलवाहिनीला पन्नास टक्क्यांच्या वर गळती होती त्यामुळे शहराला अपेक्षित दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता त्यामुळे ही मुख्य जलवाहिनी बदलण्याला प्राधान्य देण्यात आले होते.यामुळे आता रत्नागिरी शहराला उच्च दाबाने पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.या शुभारंभ कार्यक्रमाला नगराध्यक्ष बंड्या साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे,पाणी सभापती विकास पाटील,नगरसेवक निमेश नायर,बाळु साळवी,तुषार साळवी आदी जण उपस्थित होते.या पाणी योजनेच्या या भागाचे काम पावसा आधी पूर्ण करण्याकरिता नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पुढाकार घेतला होता.
www.konkantoday.com