रत्नागिरी शहरातील जलवाहिनीचा शुभारंभ आज रविवारी ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत हाेणार

रत्नागिरी शहरातपाणी टंचाई तीव्र होत असताना रत्नागिरी शहरवासीयांसाठी मोठी दिलासादायक बाब पुढे आली आहे.टंचाईच्या काळात शहरवासीयांना दरदिवशी मुबलक पाणी देण्याच्यावचनाची पूर्ती होत आहे. शीळ धरणाची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे पूर्ण झाल्याने दोन दिवसात शहरवासीयांना दिवसाआड नाही तर दररोज मुबलक पाणी मिळणार आहे.या जलवाहिनीचा शुभारंभ आज रविवारी ना. सामंत यांच्या उपस्थितीत होत आहे.शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉपपर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलण्याचेकाम पूर्ण होत आहे. त्यामुळे जॅकवेलमधील विद्युत पंपही 300 अश्वशक्तीचे बसविण्यात येणार आहेत. उच्च दाबाने पाणीपुरवठा होऊन साठवण टाक्या क्षमतेने भरणार आहेत. त्यामुळे दरदिवशी शहरवासीयांना मुबलक पाणी देता येणार आहे. शहरवासीयांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतोय यातच समाधान आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button