रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१,आज आणखी ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेले कोरोना संशयितांच्या अहवालांपैकी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १५१ झाली आहे तर अॅक्टिव कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०४ झाली आहे.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह आलेले चार रुग्ण हे एकाच कुटुंबातील असून ताले तालुका खेड या गावातील आहेत.हे सर्व मुंबई येथून दाखल झाले होते.त्यांना ताप असल्याने क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.यातील दोन पुरुष दोन स्त्रिया आहेत.तर अन्य दोन पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे देखील मुंबई आणि ठाणे येथून आलेले आहेत.यातील ठाणे येथून आलेल्या युवकाचे गाव वरावली असे आहे.तर मुंबई मुलुंड येथून आलेल्या रुग्णांचे गाव दयाल तालुका खेड जिल्हा रत्नागिरी असे आहे.
मिरज येथे एकूण २७ अहवाल पाठवण्यात आले होते.त्यातील रत्नागिरी येथील २० अहवाल निगेटिव्ह तर कळंबणी येथील १ अहवाल असे २१ अहवाल निगेटिव आले होते.
www.konkantoday.com