नदीकिनारी होडीतून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुक विरोधात कारवाई
सिंधुदुर्ग जिल्यातील सातोसे-दत्तवाडी येथे तेरेखोल नदीकिनारी होडीतून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात येथील पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता कारवाई केली. १लाख ८८ हजार १६० रुपयांच्या दारूसह ३ लाख ५० हजारांची मोटार (एमएच 07 क्यू 4959), असा एकूण ५लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.तेरेखोल नदीत होडीतून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारूची वाहतूक होत असल्याचीमाहिती येथील पोलिसांना मिळाली होती.
www.konkantoday.com