
धरणाची क्षमता तपासून तात्काळ दुरूस्ती करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
गेल्या वर्षी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून २३ ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला होता. यंदाच्या पावसापूर्वी जिल्ह्यातील सर्व धरणांची क्षमता तपासून दुरूस्तीला तात्काळ सुरूवात करा असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. पावसाळ्यात चिपळूण, खेड, राजापूर शहरात अनेकता महापुराचे पाणी शिरून मोठे नुकसान होते व वित्तहानी होते. अशा ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असणार्या बोटींची खरेदी करा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे. जिल्ह्यात भूकंपमापन यंत्रणा देखील स्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com