दिल्लीहून सुटणार्या राजधानी एक्स्प्रेसने आतापर्यंत गाेव्यात आले 30 हून अधिक काेराेना रुग्ण
दिल्लीहून सुटणारी राजधानी एक्स्प्रेसने आतापर्यंत आलेले 30 हून अधिक रुग्ण हे कोरोना संसर्गित ठरले आहेत. शनिवारी रात्री एकाचवेळी 11 संसर्गीत रुगण या ट्रेनमधून मडगावला उतरले आहेत. सर्वांना मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
नवीन रुग्णात ७महिला तर ४ पुरूष आहेत. एका ५ वर्षीय मुलाचाही त्यात समावेश आहे. ट्रुनेट चाचणीत पॉझिटीव्ह आढळल्यामुळे त्यांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉत पीसीआर चाचणीसाठीही त्यांच्या लाळेचे नमुने पाठवून संसर्गाची खात्रीही करण्यात आली आहे.
राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांब्याला गोवेकरांचा विरोध होता. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी या ट्रेनला गोव्यात थांबा नको अशी मागणी करून सरकारवर हल्ला चढविला होता
www.konkantoday.com