
कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरें
कोरोनाचे रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसंच हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरें म्हणाले आहेत. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, आपण जगायचं कसं हे कोरोनामुळे शिकलो आहे. लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता ‘लॉकडाऊन’ शब्द वापरू नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू, पुढील काही महिने मास्क घालावे लागतील, सतत हात धुवावे लागतील, एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर न थुंकणे अशा गोष्टींचं पालन करावं लागणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
♦️मुस्लीम बांधवांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा. कुठेही गर्दी करू नका. घरातूनच आपली प्रार्थना करा आणि प्रार्थनेमध्ये महाराष्ट्रासाठी दुवा करा.
♦️महाराष्ट्रात 33 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 13 हजार रुग्ण हे आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे केंद्राचा दीड लाख रुग्ण असतील हा अंदाज आपण सर्वांनी घरी बसून खोटा ठरवला आहे. आपण कोरोनावर मात करत आहोत.
बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज वाढले आहे. आज बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण कोरोनावर मात करत आहेत.
♦️पुढची परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांचा गुणाकार हा वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटामुळे अनेकांना उपचार मिळत नाही हे खर आहे. मात्र आता आपण आपल्या वैद्यकीय सुविधेमध्ये अमुलाग्र प्रगती केली आहे.
सध्या आपल्याकडे 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. तर पुढच्या महिन्यात आणखी 13 हजार बेड उपलब्ध होणार आहेत.
♦️सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्त कमी पडत आहे. त्यामुळे रक्तदान करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
थकवा जाणवत असेल, ताप येतोय, वास येण जाणवत नाहीये, असे काही होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही कोरोनाची नवी लक्षणंं आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
♦️ शिवथाळीच्या माध्यमातून लाखो लोक 5 रुपयात जेवत आहेत. अनेक ठिकाणी मोफत उपचार दिले जात आहेत.
♦️ 481 ट्रेन राज्यातून परराज्यात सोडल्या आहेत. तर आतापर्यंत 6 ते 7 लाख घरी गेली आहेत.यासाठी 85 कोटी रुपये दिले.
एसटीच्या माध्यमातून आज 3 लाखजणांना घरी पोहचवल आहे. यासाठी 75 कोटी खर्च केला.
♦️अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा निणय होणार आहेत.
सर्व काही हळूहळू सुरळीत होणार आहे
. ♦️उद्योग, यंत्रमागावरील उद्योगांना परवानगी दिली आहे.
♦️एस टी ला वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.
♦️चित्रीकरणासाठी देखील निर्णय होत आहे. अनेकांशी बैठका सुरु आहेत. त्यामुळे लवकरच चित्रीकरणाला देखील परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल,
♦️हा संकटाचा काळ आहे. कोणीही राजकारण करू नये. आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. सध्या माणुसकी धर्म महत्वाचा आहे, त्यामुळे मी राजकारण करणार नाही, तुम्हीही करू नका.
♦️ हो किंवा नाही असे म्हणून काढता येणार नाही. आपल्याला हा लॉकडाऊन हळूहळू काढावा लागेल. अचानक काढता येणार नाही. त्यामुळे घाई करून चालणार नाही.
आपल्याला कोरोनाबरोबर जागाव लागणार आहे. आपल्यला मास्क घालून समाजात वावरायला लागेल. सतत हात धुवावे लागतील.
कोरोना काही चांगल्या गोष्टी देखील शिकवत आहे. आपल्याला आता इथून पुढे स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका.
www.konkantoday.com