
रत्नागिरी शहरात आठवडा बाजार येथे कम्युनिटी हॉल, तेली आळीतील राखिव भूखंडावर बगिचा उभारला जाणार
रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक पावले उचलली जात असून गेली अनेक वर्षे नगरपरिषदेने संपादित केलेल्या खाजगी जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाल्या नव्हत्या. मात्र आता या जागा नगरपरिषदेमध्ये हस्तांतरित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जागा आता नगरपरिषदेच्या ताब्यात आल्याने त्या ठिकाणी जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आठवडा बाजारनजिक भूखंड क्र. १५१ मध्ये कम्युनिटी हॉल बांधण्यात येणार आहे. तर तेली आळी येथील भूखंड क्र. ६० मध्ये बगीचाची उभारणी करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com