मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालन दुरूस्तीला जि.प. अध्यक्षांनी दिली स्थगिती
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या दालनाचे नुतनीकरण व सुशोभिकरणाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी स्थगिती दिली आहे. कोणत्याही आर्थिक तरतुदीला प्रशासकीय मान्यता नसताना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दालनाच्या सुशोभिकरणाच्या कामाला सुरूवात केली होती. याबाबत सर्वत्र टीका झाल्यानंतर जि.प. अध्यक्ष रोहन बने यांनी यात जातीने लक्ष घालून या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ठेकेदारांनी सद्यस्थितीत तेथील सामान हलविले आहे. ३ लाख २० हजार रुपये खर्च करून बगाटे यांच्या दालनाची दुरूस्ती करण्यात येणार होती.
www.konkantoday.com