गणपतीपुळे-रत्नागिरी दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार

गेल्या अनेक वर्षांपासून सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होणार्‍या शिरगाव येथील प्रश्‍न मार्गी लावण्यात ना. उदय सामंत यांना यश आले आहे. शिरगांव रेशनदुकान ते उर्दू शाळेपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे.गेल्या अनेक वर्षापासून या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जटील बनलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासन, पोलीस व शिरगांव-कासारवेली-काळबादेवी पंचकोशीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिरगावच्या वाहतूक कोंडीचे फेरसर्वेक्षण करण्यात आले होते. त्या पाहणीत अधिकार्‍यांनी सुचविलेले पर्याय व ग्रामस्थांनी त्यासाठी दर्शवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे येथील रस्ता रुंदीकरणावर मार्ग निघाला.कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नागरिकांशी समन्वय साधला होता. ना. सामंत यांनी अधिकार्‍यांसमवेत शिरगाव येथे भेट देत तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली होती. ग्रामस्थांचे सहकार्य व अपेक्षा व्यक्त करताना रुंदीकरणावेळी कोणत्याही ग्रामस्थांचे एकही घर जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे स्पष्ट केले होते. त्या पाहणीत अधिकार्‍यांनी सुचविलेले पर्याय व ग्रामस्थांनी त्यासाठी दर्शवलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्‍नाबाबत ग्रामस्थांनी विचार केला. या कामासाठी २ कोटीचे अंदाजपत्रक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आले होते. शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच सौ. वैशाली गावडे यांनी हे काम मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता.
इतर सर्व ग्रा.पं. सदस्यांच्या नेतृत्वाखाली तेथील संघर्ष समितीच्या पुढाकाराने बैठक घेण्यात येऊन चर्चा झाली. त्यावेळी येथील ग्रामस्थही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यासाठी आग्रही दिसले. रस्त्या लगतच्या १७बाधित रहिवाशांनीही समंती दर्शवली. बाधितांना पुन्हा बांधबंदिस्ती बांधकाम विभागाकडून करून दिली जाणार तसेच मंजुर निधीतून साडेसहा मीटर रूंदीचा रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. यामुळे गर्दीच्यावेळी होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. विशेषत: गणपतीपुळे-रत्नागिरी दरम्यान प्रवास करताना आता दीड-दोन तास वाहतूक कोंडी आता हाेणार नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button