
कोरोना रूग्णाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निकाली निघाला
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचार घेत असताना एक महिला मृत झाली. ही महिला मुंबई येथे रहात होती. तिचे सासर चिपळूणला होते. ती आजारी असल्याने तिला रत्नागिरीत उपचारासाठी आणण्यात आले. तिचे माहेर रत्नागिरी शांतीनगर येथे आहे. सदर महिलेला कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्यावर तिला रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती महिला उपचाराच्या दरम्याने मयत झाली. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला हाेता तिचे सासर असलेल्या गावातील लोकांनी त्या ठिकाणी गावात अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला हाेता गेल्यावेळी दापोली येथील मृत झालेल्या महिलेचा अंत्यसंस्कार रत्नागिरीतील शिवाजीनगर येथे असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला होता. मात्र आता त्या ठिकाणी देखील अंत्यसंस्कार करण्यास विरोध होत हाेता.. त्या महिलेवर अंत्यसंस्कार कुठे करायचा? असा पेच निर्माण झाला होता. अखेर याबाबत आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. प्रसाद लाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या महिलेवर तिच्या सासरच्या गावात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आता या महिलेवर गावी काल अंत्यसंस्कार झाले असल्याने याविषयी असलेला पेच अखेर संपुष्टात आला.
www.konkantoday.com