
राज्यात बरे झालेल्यांची संख्या विक्रमी; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले.कोरोनाचे काल २३४५ नवीन रुग्ण -आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. काल २३४५ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
www.konkantoday.com