महाआघाडी शासनाला परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव देण्यासाठी भा.ज.पा चे आज महाराष्ट्र बचाव आंदोलन
गेले दोन महिने सर्व देश कोविड आजाराशी सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्था ठप्प झाली आहे अशा कठीण प्रसंगात राज्यशासनाच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. चुकीची धोरणे, प्रशासनाबरोबर नसलेला ताळमेळ, जनतेला वाऱ्यावर सोडून देण्याची प्रवृत्ती, हातावर पोट असलेल्या वर्गासाठी कोणतेही आर्थिक मदत पॅकेज न देण्याचा बेमुर्वतखोरपणा शासन दाखवत आहे
महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारावी यासाठी भा.ज.पा ने शासनाचे लक्ष वेधून परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आणून देणे आवश्यक झाल्याने लोकांच्या सहभागाने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. ” माझे अंगण हेच रणांगण ” अशा स्वरूपाचे हे आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे त्यानुसार हे आंदोलन रत्नागिरीमध्येही होणार आहे. राज्यशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून हातात फलक घेवून कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग तसेच अन्य सर्व काळजी घेत आपापल्या घरांच्या परिसरात तसेच भा.ज.पा कार्यालयाचे बाहेर हे आंदोलन करतील. रत्नागिरी शहरात सर्व प्रभागात तसेच राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी तालुका येथे हे आंदोलन सकाळी ११.०० वाजता त्या त्या तालुकाध्यक्षांचे नेतृत्वाखाली केले जाईल. समस्त जनतेनेही या आंदोलनात सह्भागी होऊन शासनाच्या अकार्यक्षम धोरणांचा धिक्कार करावा असे आवाहन भा.ज.पा रत्नागिरीने केले आहे.
www.konkantoday.com