
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये दुर्गंधी ग्राहक हैराण
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये दुर्गंधी पसरली आहे. वातानुकुलीत असूनही अस्वच्छपणाचा कळस असल्याने दुर्गंधीमुळे माखजनकर हैराण झाले आहेत.एटीएममध्ये उंदीर, खार, पाली आदींच्या मल मुत्राचा वास येत आहे. वातानुकुलीत बंद असलेल्या एटीएम खोलीत पैसे काढण्यापुरते सुद्धा उभे राहणे जिकिरीचे जात आहे. महाराष्ट्र बँकेच्या माखजन शाखेच्या खालील बाजूस हे एटीएम आहे. असे असताना देखील शाखेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.www.konkantoday.com