मला राजकारण करायचं असतं, तर त्यांना सिंधुदुर्गच्या वेशीवरच अडवून क्वारंटाईन केले असते-उदय सांमत
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण व इतर काही मंडळी मुंबईतील रेड झोन, कंटेन्मेंट झोनमधून रत्नागिरी-सिंधुदुर्गात आली . मला राजकारण करायचं असतं, तर त्यांना सिंधुदुर्गच्या वेशीवरच अडवून क्वारंटाईन करता आले असते; पण आम्ही चुकीचे राजकारण करत नाही. याउलट भाजपची नेतेमंडळी सिंधुदुर्गात येऊन फसवी आणि खोटी माहिती सिंधुदुर्गवासीयांना देत असल्याचा आरोप ना उदय सामंत यांनी केला आहे
www.konkantoday.com