
गरम्याने हैराण झालेल्या चोरट्याचा चक्क एसीवरच डल्ला.
दापोली तालुक्यातील आसूद येथील झेन व्हिलाज रो हाऊसमधून अज्ञाताने एसी चोरून नेल्याची घटना ८ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश किसन कातळकर (४०, रा. मूळ सडवे लोहारवाडी) हे झेन व्हिलाज रो हाऊस येथे कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले होते. ८ मे रोजी सकाळी ८ वाजता इमारतीच्या परिसर व इमारतीच्या आतील बाजूस पाहणी करत असताना बी-३ या बेडरूममधील एसी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रो हाऊसचे मालक प्रकाश गुरव यांच्या कानावर ही घटना घातली. त्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात एसी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com