खेड तालुक्यातील अल्पवयीन युवती गर्भवती, संशयितास जामीन मंजूर

खेड तालुक्यातील एका पीडित अल्पवयीन युवतीशी शारिरीक संबंध ठेवत ६ आठवड्यांची गर्भवती ठेवल्याच्या आरोपातून चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथील जगदीश रघुनाथ हिलम या संशयितास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने ऍड. स्वरूप थरवळ यांनी काम पाहिले. या पीडित युवतीशी संशयिताने ओळख वाढवत ती अल्पवयीन असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. यातून ती ६ आठवड्यांची गर्भवती राहिली. त्यानुसार येथील पोलीस स्थानकात पोस्कोंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून ३० मे रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावतीने ऍड. थरवळ यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button