
रेल्वेच्या डब्यात पाय टाकायलाही जागा नाही, डबे कमी, गर्दी जास्त… प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा
सण जवळ आला की गावी जाण्याची ओढ मनात दाटून आलेय पण रेल्वेच्या डब्यात पाय टाकायलाही जागा नाही, असे चित्र कोकणात येणार्या रेल्वे गाडीत दिसते. सणासुदीच्या काळात गाड्या भरगच्च, डबे मर्यादित आणि प्रवाशांची तुफान गर्दी यामुळे रेल्वे प्रवास अक्षरशः सहनशक्तीची परीक्षा घेतो. यामुळे रेल्वे प्रशासनाकडे डबे वाढवण्याच्या मागण्या आकाशाला भिडल्या असल्या तरी अद्याप ठोस हालचाल नाही.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडल्यास कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते, अशी मागणी प्रवासी करत आहेत. विशेषतः जनशताब्दी, तुतारी, आणि सावंतवाडी दिवा पॅसेंजर यांसारख्या कायम गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये जादा डबे वाढवल्यास शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com




