
रविवारी रात्री त्या काळात विजेची मागणी तब्बल ३२३२ मेगावॅटने घटली
पंतप्रधानांनी घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलनाचे आवाहन केल्याने रविवारी रात्री ९ ते ९.१० या काळात राज्यातील विजेची मागणी १७०० मेगावॅटने कमी होईल असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ही मागणी तब्बल ३२३२ मेगावॅटने घटली. मात्र, राज्यातील जलविद्यूत प्रकल्प आणि सेंट्रल एक्स्चेंजमधिल वीज पुरवठ्यात कौशल्यपुर्ण पध्दतीने ताळमेळ साधत महाराष्ट्र अंधारात बुडेल ही भीती राज्यातील वीज कंपन्यांनी खोटी ठरवली.
www.konkantoday.com