कोरोनाच्या लढाईत दापाेली तालुक्यातील विरसईचे आदर्शवत काम
कोरोनाच्या लढाईत दापाेली तालुक्यातील विरसई गावाने चाकरमान्यांना उत्तम सुविधा पुरवित तालुका वासिंयासमोर एक आदर्श घालून दिला आहे.येवा कोकण आपलाच आसा
या म्हणीप्रमाणे आलेल्या चाकरमान्यांना विरसई ग्रामस्थांनी सन्मानाची वागणूक देत कोरोनाच्या संकट समयी विरसई प्याटर्न तयार केला आहे. आजमितीस गावात सुमारे ८६ चाकरमानी दाखल झाले आहेत. या सर्वांना जेवणासह सर्व सोयी सुविधा ग्रामस्थ मंडळाकडून पुरविल्या जात आहेत. यामध्ये गावातील महिला मंडळही चाकरमान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.गावात आलेल्या चाकरमान्यांना गावातील शाळा उपलब्ध करन देण्यात आली असून पाच शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. एकीकडे एखादया गावात आलेल्या चाकरमान्यांकडे कुत्सिकपणे पाहताना ग्रामस्थ दिसतात, मात्र विरसई गावाने सर्वांसमोर एक उत्तम आदर्श घालत आलेल्या चाकरमान्यांना सन्मानाची वागणूक देत जनसेवा हिच इश्वरसेवा मानत ग्रामस्थ झटताना दिसत आहेत.
www.konkantoday.com