राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ
करोनामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती अजून कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे, तर दुसरीकडे करोनावर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासा देणारी आहे. राज्यात बुधवारी २ हजार २५० रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीच्या काही दिवसात परिस्थिती दिलासादायक होती. मात्र, त्यानंतर करोनाच्या संसर्गाचा वेग झपाट्यानं वाढला आहे.
www.konkantoday.com