रत्नागिरी हॉटेल कोहिनूर वळणावर ट्रकचा अपघात, ट्रकखाली १ माणूस सापडला

रत्नागिरी शहराजवळील भाटे कोहिनूर हॉटेलजवळ ट्रक चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक बाजूला असलेल्या चरात कोसळला.कोसळलेल्या ट्रकखाली एक जण सापडल्याची माहिती मिळत आहे.सदरचा ट्रक एका कंपनीतून सामान भरून भिवंडी-ठाणे येथे जात होता.हा ट्रक कोहिनूर हॉटेल जवळील उतारावर आला असता भाटे दर्गा स्टॉप येथे ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला व ट्रक बाजूला खोल खड्डयात जाऊन पलटी झाला.या अपघातात ट्रकखाली एक इसम सापडला आहे.हा अपघात काल रात्री झाल्याचे कळते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button