रत्नागिरीत आर्मी ऑफिसरच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करण्याचा असफल प्रयत्न, अशा पद्धतीची दुसरी घटना

रत्नागिरीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका दुग्ध व्यापार्याची आर्मी ऑफिसर असल्याची बातावणी करून एटीएम कार्डद्वारे ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला होता.परंतु व्यापाऱ्याने दाखवलेल्या जागरूकतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. असाच एक प्रकार रत्नागिरीतील एका हॉटेल व्यावसायिकाला आला आहे.रत्नागिरी मधील MOC या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पार्सल ऑर्डर देण्याकरिता फोन आला.फोन केलेल्या व्यक्तीने आपण आर्मी ऑफिसर असल्याची माहिती दिली.त्याने आपलं नाव अमन कुमार असा देखील सांगितलं व जेवणाची ऑर्डर दिली व थोड्या वेळानंतर रेस्टॉरंटमधून ऑर्डर पिक अप करतो असे देखील त्याने सांगितले. दिलेल्या ऑर्डरच्या जेवणाचं बिल साधारण तेराशे रुपये होत होते.ऑर्डर होऊन बराच वेळ झाल्यानंतर देखील तो आला नाही म्हणून रेस्टॉरंटच्या मालकांनी त्याला पुन्हा फोन केला.फोन उचलल्यावर त्याने रेस्टॉरंटच्या मालकपाशी एटीएम कार्ड व सीव्हीव्ही नंबरची मागणी केली व डिफेन्स कार्डच्या एसबीआय एटीएममधून कार्डमधून कार्ड टू कार्ड पेमेंट करण्याची बातावणी केली.अशापद्धतीने कार्ड डिटेल ची मागणी केल्यामुळे रेस्टॉरंट मालकाला याचा संशय आला व त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरीसाठी आग्रह धरला.परंतु फोन केलेल्या व्यक्तीने आपण पेमेंट झाल्यानंतरच ड्रायव्हरला पाठवणार असे सांगितले. वारंवार एटीएम कार्ड व सीव्हीव्ही नंबरचा आग्रह धरला यामुळे रेस्टॉरंट मालकाला हा फ्रॉड कॉल असल्याचे पटले व त्यांनी फोन ठेवला.रेस्टॉरंटच्या मालकाने दाखवलेल्या जागरूकतेमुळे फसवणूक होता होता वाचली.असाच एक प्रकार रत्नागिरीतील आंबा व्यावसायिकाबरोबर देखील घडला होता.आर्मी ऑफिसरच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची टोळी असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे अशा प्रकारचा अनुभव व फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस स्थानकात तक्रार करणं जरुरीचं बनला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button